धाराशिव – समय सारथी
आई तुळजाभवानीला सांगायची गरज नाही, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेल. मंत्रीपदाच्या रूपाने आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आमदार राणाजगजीतसिंह पाटील मिळणार आहे. फडणवीस शब्दाचे पक्के आहेत त्यांना सांगायची गरज नाही, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उभे केल्याशिवाय राहत नाही त्यांना संधी दिली जाते आणि ती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना मिळेल असे सांगत त्यांनी आगामी काळात मंत्रीपद दिले जाईल असे संकेत दिले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा सर्वात कर्तव्यदक्ष आमदार असा उल्लेख बावनकुळे यांनी केला. कर्तृत्वान व्यक्तीचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानले.हा सत्कार समारंभ भावनात्मक आहे, तो सत्कार करण्याची संधी मिळाली याबद्दल आभार मानले. तुळजाभवानी विकास कार्याकरीता तुळजाभवानी देवीच्या आशिर्वादामुळे राणाजगजीतसिंह पाटील यांचा जन्म झाला असेल, या धर्म कामामुळे त्यांचे नाव अजरामर होईल, लोक वर्षानुवर्षे स्मरणात ठेवतील, छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित काम इथे त्यांनी केले आहे असे म्हणाले.
राणाजगजीतसिंह पाटील हे नशीबवान आहेत त्यांना तुळजापूरचा आमदार होता आले. त्यांनी जे कार्य केले आहे ते अमर असुन मी त्याला सलाम करतो असे बावनकुळे म्हणाले. आमदार पाटील नको म्हणाले असताना हा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल विनोद पिटू गंगणे व त्यांच्या टीमचे कौतुक करीत गौरव उदगार काढले.
तुळजाभवानीचे वैभव जगात गेले आहे, ही केवळ दैवी शक्ती नसुन मराठी मानाचा स्वाभिमान श्वास आहे, स्वराज्य स्थापनचा आशीर्वाद दिला, जय भवानी जय शिवाजी हा हिंदुत्वचा श्वास अभिमान आहे. महाराष्ट्राची अध्यात्मिक ताकत तुळजाभवानी आहे. विकास करण्याचे भाग्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला विचारले त्यावेळी मी सांगितले की सर्वात कार्यक्षम आमदारमध्ये राणाजगजीतसिंह पाटील हे टॉप 10 आमदारमध्ये आहेत. आमदार पाटील यांनी अध्यात्मिक,संस्कृतीक व धार्मिक विकास केला, समाजाचे दुःख अडचणी त्यांना कळतात. माझ्यापेक्षा जास्त काम आमदार पाटील यांनी केले आहे. विकसित महाराष्ट्र संकल्प सुरु करून अभियान सुरु केले आहे, त्यात धाराशिव सर्वात जास्त विकसित झाला पाहिजे असा संकल्प त्यांनी केला.
राणाजगजीतसिंह पाटील हे मदत पुनर्वसन मंत्री असताना ते माझ्या मतदार संघात आले, शेतकरी उपोषणास बसले त्यावेळी त्यांनी निवेदन घेतले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्यावेळी मी आमदार होतो त्यामुळे त्यांचे आभार मानले. 21 वर्षापुर्वी आमदार पाटील यांनी स्व विलासराव देशमुख यांच्यासमोर विकास आराखडा मांडला मात्र तो प्रलंबीत राहिला, त्यावर टीका करण्याचा अधिकार मला नाही मात्र तो आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर करीत आमदार पाटील यांच्या माध्यमातुन पुर्ण करणार आहेत असे म्हणाले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, तुम्ही जे प्रेम दाखवले आहे ते जन्मात कधीही विसरू शकत नाही त्यामुळे काय बोलावे हा प्रश्न पडतोय, महायुती सरकारच्या माध्यमातुन कायापालट होत आहे. सरकारने जे निर्णय घेतले त्याचा फायदा सगळ्या जनतेला होणार आहे. रेल्वे, सिंचन प्रकल्प हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यामुळे येत आहेत. मी राज्यमंत्री झाल्यावर तुळजाभवानी देवीचे दर्शन घ्यायला आलो होतो, मला काय सुचले माहिती नाही, मी संपुर्ण मंदीर परिसर पाहिला. 2004 साली 21 वर्षापुर्वी मी विचार केला की तुळजाभवानी परिसराचा विकास करायचा त्यानुसार मी विकास आराखडा तयार केला तो सादर केला. 21 वर्षापुर्वी जे मनात आले ते करण्याची संधी आली आहे, मी तुळजाभवानीचे ऋण फेडू शकत नाही असे म्हणाले.
तुळजापूरचा कायापालट करायचा आहे. तुळजापूरचा आर्थिक विकास होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, तुळजापूर हे वैश्विक स्तराचे तीर्थक्षेत्र करू असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते, ते काम करण्याची संधी आहे. 108 फुटाची भवानी तलवार देखावा उभा करण्यात येणार आहे, अनेक कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे भाविक इथे थांबतील, पर्यटन वाढेल असे पाटील म्हणाले. तीर्थक्षेत्र विकास हे वयक्तिक काम नाही, आई तुळजाभवानी देवीचे काम सुरु आहे, त्यामुळे काही तरी बोलुन खोडा घालू नये असे आवाहन विरोधकांना केले. विकास कामात काही अडचण आली तर सरकार सोडवायला सक्षम व कटीबद्ध आहे असे आश्वासन दिले.