रोचकरी यांचा भाजपशी दुरानव्ये संबंध नाही – जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील देवानंद रोचकरी हे भाजपचे स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात मात्र तुळजाभवानी देवीचे मंकावती तिर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने हिंदुत्वाचा नारा देणार्या भाजपची मोठी नाचक्की झाली होती. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यावर भाजपने भूमिका स्पष्ट केली आहे.
देवानंद रोचकरी यांचा भाजप पक्षाशी दुरानव्ये संबंध नसल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली. रोचकरी हे भाजप पक्षाच्या कोणत्याही पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत किंवा सक्रीय नसून ते सध्या पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत त्यामुळे त्यांचा भाजपशी थेट संबंध राहिलेला नाही. ते यापूर्वी भाजपात होते मात्र बराच काळ ते सक्रीय नाहीत त्यामुळे ते आजच्या स्तिथीत भाजपमध्ये नाहीत त्यांचा संबंध नाही.मंकावती हे प्रकरण त्यांचे वयक्तिक आहे त्याचा पक्षाचा काही संबंध नाही.
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात इतर आरोपी विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद असून तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत.
पण भाजप चे उपजिल्हा अध्यक्ष असतानाच तीर्थ कुंड आणि जुन्या बस स्टँड समोरची शासनाची जागा हडपली आहे
संजय राठोड हे मंत्री असताना त्यांनीच तर बेकायदेशीर ऑर्डर करून शशनाची जागा मिळवून दिली आहे आणि त्यास चंद्रकांत पाटलांनी मदत केली आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. मग कसे भाजप शी संबंध नाही म्हणता. हडपल्याल्या जागेत तर भाजप चे मध्यवर्ती कार्यालय आहे
अधिक माहिती व कागदपत्रे द्या , बातमी करू