धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरातील लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखेमधील 34 लाख 50 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. बँकेतील रोख रकमेसह सोन्यावरही डल्ला मारण्याचे बोलले जात आहे. बँक शाखेतील शिपाई दत्ता कांबळे (रा धारूर ता धाराशिव) याचा मोबाईल बंद असून तो बेपत्ता असल्याने संभ्रम व संशय वाढला आहे. लोकमंगल मल्टीस्टेटमधील रकमेवर गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा डल्ला मारला आहे.
चोरी करण्यापूर्वी मीटरमधून वीजपुरवठा खंडीत केला, चोरट्याने अलार्म बंद केला. चोरट्याकडे सर्व चाव्या होत्या, त्याला बँकेतील इत्यंभूत माहिती असल्याने त्याने सहज चोरी केली. याप्रकरणी व्यवस्थापक सुनील साळुंके यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय थोटे तपास करीत आहेत.
नवीन बस स्थानकासमोरील लोकमंगल मल्टीस्टेट शाखेत रविवारी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 चोरी झाल्याचा संशय आहे. चोरट्यानी बँकेचे शटर उचकटून तिजोरीतील 34 लाख 60 हजार लंपास केले.