नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई – मोठे रॅकेट समोर येणार
नाशिक – समय सारथी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव येथे मोठी कारवाई करीत अनाधिकृतपणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा मारला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील शेख हा अनधिकृत बायोडिझेल पंप चालत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. जलील हा त्याच्याच मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत डिझेल पंप उभा करून डिझेलची विक्री करीत होता. पंपावर मिळणाऱ्या डिझेलपेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने जलील हा बायोडिझेल विकत होता. हा बायोडिझेल पंप हा अनाधिकृत होता असे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात याचे मोठे जाळे असण्याची शक्यता असून पोलीस याचा तपास करीत आहेत.जलील यांच्या या धंद्यात आणखी कोणाचा सहभाग व भागीदार आहेत ? हे अवैध डिझेल साठा कुठून पुरवला जात होता ? याचा पोलीस तपास करीत आहेत.यात अनेकजण रडारवर आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी यापूर्वी नाशिक ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीत सहभागी असलेल्या अनेक मद्यसम्राटांवर कारवाई करीत त्यांचे जाळे मोडकळीस आणले होते तर इगतपुरी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा भांडाफोड करीत मराठी बिग बॉस अभिनेत्री हिना पांचाळ सह टीव्ही सिरियल्स, बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेमाशी संबंधित 6 महिलांसह 22 जणांना ड्रगसह अटक केली होती.कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न मंगल कार्यालयास दंड ठोठावून सिलही ठोकले होते. गुन्हेगार यांच्यावर कारवाई व वचक ठेवण्यासोबतच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता, द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याने बुडविलेले जवळपास 20 कोटी त्यांनी कारवाई करीत मिळवून दिले आहेत तर कोरोना काळात कर्तव्यावर असताना शाहिद झालेल्या पोलीस कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून त्याचे पालकत्व घेत त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.