सोलापूर – समय सारथी
शिवसेना (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख असून देखील विश्वासात घेता व न सांगता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर माझ्या तालुक्यातील तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांच्याही नियुक्तया केल्या आहेत. पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत असल्याचे नमुद केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा व आनंद दिघे यांचा सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार आहे असल्याची भुमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.