तुळजापूर – समय सारथी
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 25 जुलै शुक्रवारपासुन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भक्तांना प्रसाद म्हणुन सशुल्क बुंदीचा लाडू देण्यात येणार आहे, तुळजाभवानी मंदीर संस्थानने हा निर्णय घेतला असुन पुणे येथील. चितळे बंधु यांनी शुद्ध तुपात बनविलेल्या या 50 ग्राम लाडूसाठी भाविकांना 30 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून यापुर्वी बुंदी लाडू देण्यात येत होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्रसादाचे वितरण थांबवण्यात आले, त्यानंतर लाडू प्रसाद बंद झाला, तो पुन्हा सुरु करण्यासाठी मंदिर प्रशासनाने यासंदर्भात निविदा मागवल्या होत्या. यात पुणे येथील मिठाई व्यापारी चितळे बंधूंना लाडू वितरणाचे हक्क देण्यात आले आहेत.