नाशिक – समय सारथी
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडुन स्थगिती मिळाली आहे याबाबत न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी आदेश दिले आहेत.डिसेंबर अखेर बदली करू नये असे न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिल्याची माहिती असून कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना बदली केल्याने न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निषेधार्थ नाशिकमध्ये सरकारच्या भूमिकेविरोधात बॅनर लागले होते. अखेर सामान्य नाशिककर व शेतकरी जिंकले आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीत सहभागी असलेल्या अनेक मद्यसम्राटांवर कारवाई करीत त्यांचे जाळे मोडकळीस आणले होते तर इगतपुरी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा भांडाफोड करीत मराठी बिग बॉस अभिनेत्री हिना पांचाळ सह टीव्ही सिरियल्स, बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेमाशी संबंधित 6 महिलांसह 22 जणांना ड्रगसह अटक केली होती.कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न मंगल कार्यालयास दंड ठोठावून सिलही ठोकले होते. गुन्हेगार यांच्यावर कारवाई व वचक ठेवण्यासोबतच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता, द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याने बुडविलेले जवळपास 20 कोटी त्यांनी कारवाई करीत मिळवून दिले आहेत तर कोरोना काळात कर्तव्यावर असताना शाहिद झालेल्या पोलीस कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून त्याचे पालकत्व घेत त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.मालेगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील याने पत्र्याच्या डब्ब्यात सुरू केलेल्या अवैध बायोडिझेल विक्रीसह अनेक अवैध धंद्याचा पर्दाफाश केला होता.
सचिन पाटील यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या बदलीमागे घडलेल्या घडामोडी लवकरच बाहेर येणार आहेत.