उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांना उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप समारंभ देण्यात आला यावेळी फुलांच्या पायघड्या व गुलाब पुष्पांचा वर्षाव करून पोलीस अधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे गाडी ओढून बँड पथकाच्या वाद्यात निरोप दिला.यावेळी पावसाने सुद्धा हजेरी लावली.आकर्षक फुलांनी गाडी सजवली होती.
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची उस्मानाबाद येथील कारकीर्द ही चांगली राहिली त्यांना उत्कृष्ट तपासबद्दल केंद्राचे गृहमंत्री पदक मिळाले तसेच त्यांनी केलेल्या तपासावर पुस्तक व त्यांच्या कविता संग्रह प्रकाशीत झाले आहेत. रौशन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मिसिंग केसेस ( हरवलेले व्यक्ती शोधणे) बाबत शोधण्यासाठी घ्यावयाची शोध कार्यपद्धतीची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली. रौशन यांनी यापूर्वी प्रशिक्षणार्थी काळात उस्मानाबाद जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून 2015 मध्ये काम केले होते त्यानंतर पुन्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले , 2 वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांना काम करण्याची संधी मिळणारे ते अधिकारी आहेत.
या कौटुंबीक निरोप समारंभास उपविभाग पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील नागरीक,मित्र परिवार उपस्थित होते.
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली उपायुक्त मुंबई शहर येथे झाली आहे तर त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक म्हणून निवा जैन या आज पदभार घेणार आहेत, जैन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट 1 पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. जैन यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथम महिला पोलीस अधीक्षक पदाचा मान मिळाला आहे.