उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी सोडवली महिलेची समस्या
उस्मानाबाद – समय सारथी
बदलीनंतर आयोजित केलेल्या निरोप व सत्कार समारंभानंतर जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या कर्तव्यदक्षपणाचा व माणुसकीचा अनुभव पाहायला मिळाला. राठोड हे बदलीनंतर कार्यालयातुन बाहेर जात असताना काही महिला तिथे दिसल्या त्यानंतर राठोड यांच्यातील पोलीस जागा झाला व त्यांची समस्या जाणुन घेऊन ती सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांला दिल्या.
“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांच विनाश हे पोलीस विभागाचे ब्रीद ! आहे. पोलीस हा शासनाने एका हातात कायदयाचे पुस्तक आणि दुसरया हातात दंडुका देऊन नेमलेला समाजसेवक असतो. याचा प्रत्यय गेल्या चार वर्षात उस्मानाबाद शहर परिसरच नव्हे तर जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार, सर्वच शासकीय कार्यालय ,राजकीय पदाधिकारी, पत्रकार तसेच सर्वसामान्य नागरिक यांना आला. सर्वांशी समन्वय ठेऊन पारदर्शक पोलीसिंगचा अनुभव दिला. याचा सर्वच थरातील नागरिकांना आधार वाटला. हीच अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन पुढील प्रशासकीय वाटचालीकरीता ठाणे शहर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर रुजु होण्यासाठी रवाना होत आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबध्दल राठोड यांनी आभार मानले.
पोलिसांच्या विषयी गैरसमज नाही , उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक हे सुजाण आहेत. सकारात्मक समाजकारणमुळे अनेक जण सुधारले आहेत. लोकप्रतिनिधी व शांतता समिती सदस्य यांना सोबत घेऊन ज्याची चूक झाली त्यांना सुधारण्यात आले. पारदर्शक पोलिसिंगला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.सामान्य नागरिकांच्या प्रति पोलिसांबाबत मनात आदर व विश्वासाचे नाते निर्माण करण्यात यश आल्याचे राठोड म्हणाले. नवीन अधिकारी यांना देखील नागरिकांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सचिव संतोष जाधव, अजित माळी, अनंत साखरे यांनी यावेळी राठोड यांचा सत्कार केला.