धाराशिव – समय सारथी
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन चिघळत चालले असताना रस्तारोको करणाऱ्या ४० शेतकऱ्यांवर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 19 गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आपला निषेध नोंदवला होता. आंदोलनाआधी पोलिसांनी नोटीस 7 देऊन आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहून रस्ता अडवला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनात सहभागी 40 शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आधीच जमिनीच्या जबरदस्ती अधिग्रहणामुळे शेतकरी आक्रमक झालेले असताना, आता गुन्हे दाखल केल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.