धाराशिव – समय सारथी
25 लाखांच्या ‘दरोडा’ गुन्ह्यात धाराशिव पोलिसांना मोठे यश आले असुन बँक कर्मचारीच आरोपी निघाला आहे. आर्थिक मोहापोटी आरोपीणे स्वतःवर ब्लेडने वार करीत दरोडा टाकल्याचा बनाव केला मात्र तो स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कारवाई केली. नळदुर्ग येथील लोकमंगल मल्टीस्टेट बँकेतील कर्मचारी कैलास घाटे याने 25 लाख रुपये लंपास करीत दरोडा टाकल्याचा बनाव केला.
30 जून रोजी घाटे आणि त्याचा एक सहकारी 25 लाखांची रोख रक्कम घेऊन नळदुर्गहून सोलापूरच्या मुख्य शाखेकडे मोटरसायकलवरून निघाले होते. इटकळ गावाजवळ दरोडेखोरांनी अचानक हल्ला केला, मारहाण करत पैशांची बॅग हिसकावून पळ काढली, अशी माहिती घाटेने पोलिसांना दिली मात्र तपासात त्याचा बनाव उघड झाला. इतकी मोठी रक्कम मोटरसायकलवरून नेण्यात आल्याने संशय बळावला, पोलिसांनी हिसका दाखवताच घाटेने अखेर गुन्ह्याची कबुली देत 25 लाख रुपये त्यानेच लंपास केल्याचे मान्य केले, पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.