अतिवृष्टीने शेतकऱ्यांनी खचू नये, सरकार मदत करणार – लवकरच जनसेवेत हजर राहणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी या कठीण काळात खचू नये,सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असून याबाबत ते स्वतः मुख्यमंत्री व प्रशासन यांच्या सतत संपर्कात असल्याचे कळविले आहे.
माजी मंत्री तथा भूम परंडा वाशीचे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांना गेल्या पंधरा दिवसात कोरोना निदान झाल्यामुळे ते उपचार घेत होते त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना लागलीच डेंगुची लागण झाली असून ते बेडरेस्टवर आजारी आहेत.
आता पर्यंतच्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मी मतदार संघात कुटंबप्रमुखाच्या भूमिकेने धावून आलो आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे न भरून येणारे नुकसान आले आहे. शेतकरी संकटात आहे त्यांच्या व्यथा मी समजू शकतो मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही खचू नका प्रशासन सरसकट पंचनामे करीत आहे लवकरच सरकार मदतीची घोषणा करणार आहे. वैद्यकीय अडचणीतुन आई भवानी व नागरिकांच्या आशिर्वादने लवकरच बरा होऊन पुन्हा त्याच जोमाने जनतेच्या सेवेत येणार असल्याचे डॉ सावंत म्हणाले.