घटस्थापना दुपारी 12 वाजता मात्र पूजारी,सेवेकरी व भाविकांना सायंकाळी 6 नंतर मिळणार प्रवेश
15 हजार भाविकांनाच प्रवेश – मंदिर संस्थानची नियमावलीची प्रेस नोट जाहीर
स्थानिक व पुजाऱ्यांकडून भक्त संख्या वाढविण्याची मागणी , रोज लाखोंची गर्दी
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सूरु होण्यापूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी भाविकांच्या प्रवेशाच्या संख्येबाबत एकाच दिवशी 2 वेगवेगळे आदेश काढण्यात आल्याने भविकात मोठा गोंधळ व संभ्रम निर्माण झाला. दिवेगावकर यांनी सुरुवातीला मंदिरात 30 हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल असे लेखी आदेश काढेल हे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या ग्रुपवर जिल्हाधिकारी यांचा दुसरा आदेश धडकला. त्यात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिल्याचे आदेश केले हाही आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भावीकात मोठा संभ्रम झाला मात्र 15 हजार भाविकांनाच प्रवेश असले बाबतर मंदिर संस्थानची नियमावलीची प्रेस नोट जाहीर झाल्याने संभ्रम मिटला आहे.तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी रोज लाखो भाविक तुळजापूर येथे असल्याने 15 हजारांची मर्यादा वाढवावी अशी मागणी स्थानिक व पुजाऱ्यांकडून भक्त यांच्याकडून होत आहे.
7 ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची मूळ मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यानंतर दुपारी 12 वाजता देवीच्या सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मंदिर पहाटे उघडण्यात येणार असले तरी भाविकांना, पूजारी व सेवेकरी यांना मात्र आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी 15 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. घटस्थापना झाल्यावर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक, पुजारी उत्सुक असतो मात्र त्याला दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे.
शारदीय नवरात्र महोत्सव 2019 साली पुजाऱ्यांना दिलेले ओळखपत्र सोबत ठेवने अनिवार्य असणार असून मास्क घालणे बंधनकारक राहील तसेच मंदिरात पुजाऱ्यांना प्रवेश करते वेळी ड्रेसकोड आवश्यक असेल. मंदिर गाभारा व मंदिर परिसरात भाविकांचे कोणतेही कुलाचार विधी करता येणार नाही. कोरोना लसीकरणचे 2 डोस घेतलेल्या भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. मंदिरात 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करतेवेळी मास्क घालणे अनिवार्य आहे.
मंदिरात मर्यादित स्वरूपात ऑनलाईन प्रवेश पासची सुविधा मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे मात्र हे ऑनलाईन पास हे 15 हजार भाविकांपैकी की अतिरिक्त हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी असणार आहे.कोजागिरी पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली असुन 18 ते 20 ऑक्टोबर या 3 दिवसात तुळजापूर शहरा व्यतिरिक्त इतरांना तुळजापूर शहर प्रवेश बंदी असणार आहे.सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
घटस्थापना नंतर दुपारी 12 ते सांयकाळी 6 या काळात मंदिर संस्थान नेमके काय काय करणार हे अद्याप समोर आले नाही. तुळजाभवानी उत्सव प्रशासनासाठी की भाविकांसाठी याची चर्चा रंगू लागली आहे.