धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धाराशिव पोलीस ऍक्शन मोडवर आले असुन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची जवळपास 8 पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने तस्कर गटातील फरार आरोपी नानासाहेब कुऱ्हाडे याला ठाणे जिल्ह्यातील बदलापुर तालुक्यातील वांगणी येथून ताब्यात घेते आहे. कुऱ्हाडे याने अटकपूर्व जामिनीसाठी धाराशिव कोर्टात अर्ज केला होता त्यावर 21 मे रोजी सुनावणी होणार होती मात्र त्यापुर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला, त्याला आज 20 मे रोजी कोर्टात हजर केले जाऊ शकते.कोर्टात सेवन गटाला दिलासा मिळाला नसुन 23 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
16, 17 व 19 मे असे सलग 3 दिवसात पोलिसांनी 3 आरोपीना अटक केली असुन त्यात सेवन गटातील माजी सभापती शरद जमदाडे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांचा भाचा आबासाहेब पवार,नानासाहेब कुऱ्हाडे यांचा समावेश आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 18 जणांना अटक केली असुन 18 जन फरार आहेत. 36 पैकी 16 तस्कर व 2 सेवन गटातील आरोपी अटकेत आहेत. तस्कर गटातील 26 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (18) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 18 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.