धाराशिव – समय सारथी
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असुन प्रदेश निवडणुक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी याबाबतची घोषणा केली. शांत,संयमी व पक्षातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपाच्या सर्व गटात उत्तम समन्व्य साधणारे हे नेतृत्व असुन त्यांची सार्थ निवड करण्यात आली आहे. सिद्धीविनायक समुहाच्या माध्यमातून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी बँकिंग,कारखाना,पेट्रोल पंपसह अनेक उद्योग उभारले असुन रोजगार दिला आहे. त्यांना विकासाचे व्हिजन असुन अनेक प्रकल्प वयक्ति पातळीवर प्रत्यक्षात सुरु करीत यशस्वी करुन दाखविले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज संस्था व संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही निवड महत्वाची ठरणार आहे.