धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 3 आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मीटकरी यांच्या कोर्टाने फेटाळला आहे. धाराशिव जेलमधील आरोपी अमित आरगडे, संकेत शिंदे व संदीप राठोड या 3 आरोपींचा जामीन नाकारला. यात जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी पोलीस व सरकारी पक्षाच्या वतीने मांडलेली बाजु महत्वाची ठरली. आरोपीच्या वतीने ऍड अंगद पवार व ऍड विशाल साखरे यांनी बाजु मांडली. सेवन गटातील 2 फरार आरोपीनी अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 9 मे रोजी सुनावणी होणार आहे.
धाराशिव कोर्टाने आजवर 9 आरोपींचा जामीन अर्ज नाकारला असुन त्यातील सर्व आरोपी हे तस्कर गटातील आहेत. 6 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित असुन त्यातील 4 आरोपी फरार आहेत तर 2 जेलमधील आहेत. ज्या 6 आरोपींचा जामीन अर्ज प्रलंबित आहे त्यात 4 जन पेडलर अर्थात तस्कर गटात आहेत तर 2 जन सेवन गटात आहेत, प्रथमच सेवन गटातील 2 आरोपीनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केल्याने कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
कोर्टाने 9 आरोपींचा जामीन फेटाळला आहे त्यात 2 फरार आरोपी इंद्रजीतसिंह मिटू ठाकुर, मुंबई येथील तस्कर वैभव गोळे यांचा समावेश आहे तर जेलमधील स्वराज उर्फ पिनू तेलंग, मुंबई येथील तस्कर संतोष खोत, संगीता गोळे, युवराज दळवी, अमित आरगडे, संकेत शिंदे,संदीप राठोड या 7 जणांचा समावेश आहे.
कोर्टात 6 जणांचा जामीन अर्ज प्रलंबित असुन त्यात सेवन गटातील विशाल सोंजी व अभिजीत अमृतराव या 2 जणांचा समावेश असुन हे आरोपी फरार आहेत. पेडलर गटातील माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, राहुल कदम, नानासाहेब कुऱ्हाडे व सुल्तान उर्फ टिपू शेख या 4 आरोपीनी अर्ज केला आहे त्यातील संतोष कदम व कुऱ्हाडे फरार आहेत तर शेख व राहुल कदम धाराशिव जेलमध्ये आहे. यावर 9,13,14 व 15 मे अश्या वेगवेगळ्या दिवशी सुनावणी होणार आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 15 जणांना अटक केली असुन 21 जन फरार आहेत. अटकेतील 15 पैकी 14 जन जेलमध्ये तर रणजीत पाटील हा 1 आरोपी पोलिस कोठडीत आहे.