धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात रणजीत पाटील या आरोपीस पोलिसांनी अटक केली असुन धाराशिव येथील कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल एक महिन्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 15 जणांना अटक केली असुन 21 जन फरार आहेत. अटकेतील 15 पैकी 14 जन जेलमध्ये तर 1 जन पोलिस कोठडीत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ही अटक आहे.
रणजीत रंगनाथ पाटील यांना गुन्ह्यात ड्रग्ज तस्कर गटात आरोपी करीत पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र दाखल केले आहेत. 26 जणांवर ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे त्यात रणजीत पाटील आहेत. संगणमत करुन ड्रग्जची खरेदी विक्री, वाहतूक, साठवणूक केली, पैसे पुरविले तसेच त्याचा वापर व सेवन केले. ड्रग्ज तस्करीतुन बेकायदेशीर आर्थिक फायदा घेऊन अवैध संपत्ती कमावली असा ठपका ठेवण्यात आला असुन एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(क) 21(ब) 27, 27(क) 29, 68(सी) प्रमाणे दोष ठेवला आहे.
व्यसनी गट – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमधाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे.
फरार आरोपी (21) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.