धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 4 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असुन आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आली. 7 जणांच्या जामीन अर्जावर 2 मे रोजी निकाल येणार होता मात्र 4 जणांची जामीन नाकारली असुन 3 जणांच्या जामीन अर्जावर 8 मे रोजी निकाल देण्यात येणार आहे.मुंबई येथील तस्कर संगीता गोळे, संतोष खोत, युवराज दळवी व वैभव गोळे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यातील वैभव गोळे फरार आहे तर इतर 3 जन धाराशिव जेलमध्ये आहेत.
जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात युक्तीवाद सुनावणी झाल्यानंतर त्यांनी 2 मे रोजी जामीन नाकारला, यात जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी पोलीस व सरकारी पक्षाच्या वतीने मांडलेली बाजु महत्वाची ठरली, जप्त केलेला मुद्देमाल हा ड्रग्ज असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला होता तो ऍड देशमुख यांनी कोर्टात सादर केला शिवाय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालाचा संदर्भ कोर्टात सुनावणीवेळी दिला, त्याआधारे जामीन नाकारला. आरोपींच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड विशाल साखरे, ऍड रामेश्वर सूर्यवंशी यांनी काम पाहिले. राहुल कदम, संतोष कदम व अन्य अश्या 3 आरोपीनी अर्ज दाखल केला असुन त्यावर 5 व 6 मेला सुनावणी होणार आहे.
फरार 22 आरोपीना अटक करण्यात येईल, आगामी काळात तपासात आणखी काही आरोपी वाढतील असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले. आरोपीना अटक केले तरी पुढे काय कारवाई करायची याबाबत पोलिस अधीक्षक यांना सुचना देण्यात आल्या आहेत. आपण यात फाशी देऊ शकत नाही मात्र ते म्हतारे होईपर्यंत जास्त काळ जेलमध्ये राहतील असा इशारा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिला आहे.
धाराशिव कारागृहातील आरोपी संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यातील अमित अरगडे, संकेत शिंदे व संदीप राठोड यांच्या अर्जावर 8 मे रोजी निकाल येणार आहे. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.
फरार आरोपी (22) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.