धाराशिव – समय सारथी
आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण तापले असताना, मी इथे विकास करायला आलो आहे असे म्हणत राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी विकासाचा संकल्प करीत विविध विकास योजनाची घोषणा केली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपुर्ण निधीसह अन्य निधी वापरून या योजना राबविण्यात येणार आहेत. क्रीडा, शिक्षणासह अन्य मुद्यावर त्यांनी भर दिला असुन जिल्ह्यातील 20 विद्यार्थीना नासा येथे अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात येणार असुन स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास केंद्र, महिला बचत गट व आर्थिक सक्षमीकरण, स्विमिंग पुल, पानंद रस्ते, वृक्ष लागवड, पाळीव प्राण्यांच्या स्मशानभुमीसाठी जागा व यंत्रणा उभारणे यासह अन्य योजना पालकमंत्री सरनाईक यांनी बैठकीत मांडल्या.
मी सांगेल, आदेश देईल, सही करेल कायद्यात कसे बसवायचे हे अधिकारी यांनी ठरवायचे, सामान्य लोकांचे काम थांबता कामानये असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले. धाराशिव जिल्हा दुष्काळी, मागास असे नामकरण पडले आहे ते आपण पुसू असे म्हणत त्यांनी विकासाचा संकल्प केला.
राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी राखीव स्मशानभुमी व तिथे त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करावी अशी मागणी मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती ती मागणी मान्य करीत त्याची राजभर अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्हा व तालुका स्तरावर एक स्मशानभुमी व विधीसाठी लागणारी यंत्रणा उभी करा असे निर्देश दिले. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा नावीन्यपुर्ण निधी उपलब्ध करुन घ्यावा असे आदेश दिले.
धाराशिव जिल्ह्यातील 20 विद्यार्थी यांना नासा येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे, त्यासाठी निवडीचे निकष जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ठरविले जातील. 10 मुले व 1 मुली यांची निवड केली जाणार आहे. टीव्ही व सोशल मीडियावर आपण नासा व तिथले कामकाज पाहतो मात्र ते मुलांना प्रत्यक्ष पाहता यावे, तिथंपर्यंत पोहचता यावे व पाहता यावे यासाठी ही अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे.
जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल व्हायला हवेत, 5 स्विमिंग पुल तयार करण्यात येणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मुलांना पोहता येईल व खेळात प्रगती करता येईल. बॅडमेंटन कोर्ट पण सुरु करीत आहेत. युपीएससी, एमपीएसी व इतर स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. महिला बचत गट व त्या माध्यमातून सक्षमीकरण करीत आहोत, उमेद बचत गट माध्यमातून महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी कमांड व कंट्रोल रूम आम्ही तयार करतोय. परिवहन विभाग मार्फत ड्रग्ज सेवन केले की नाही हे शोधण्यासाठी यंत्रणा, कॉलेज विद्यार्थी वर्गात जनजागृती व्हावी यासाठी 9 कोटी तरतूद करण्यात आली असुन रस्ते अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक बोर्ड, मानसीक तपासणीला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. पानंद शेतरस्ता मोहीम राबवीत असुन त्यासाठी तरतूद करीत आहोत. 50 लाख वृक्ष लागवड व संवर्धन करायचा विक्रम करणारे आहोत, हा चांगला उपक्रम असल्याचे ते म्हणाले.
भविष्यात होणारे मित्र असा उल्लेख करीत ज्यांनी उपोषण केले त्यांनी काही फोटो दाखवले. नागरिकांना त्रास होत आहे, आरोग्य अडचणीत येत आहे त्यामुळे शहरातला कचरा बाहेर गेला पाहिजे, त्यासाठी 12 एकर जागा दिली असुन ती ताब्यात घ्या व काम सुरु करा असे आदेश दिले. कचरा प्रकल्प हटला पाहिजे तोपर्यंत बायोमायनिंग व इतर अंमलबजावणी करा. कचरा गोळा करण्यासाठी 2 व्हॅन मंजुर केल्याचे घोषित केले.