परंडा – समय सारथी , किरण डाके
परंडा व तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीबाबत माजी आमदार तथा भाजपचे नेते सुजितसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, ड्रग्ज तस्करीची वस्तुस्तिथी व भीषण वास्तव यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले. ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असुन ठाकुर यांनी त्यानंतर सोलापूर व धाराशिव पोलिस अधीक्षक यांना संपर्क साधला. ठाकुर यांनी तुळजापूर व परंडा ये दोन्ही ठिकाणी दाखल ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातले असुन पाठपुरावा सुरु केला आहे.
बार्शी ड्रग्ज तस्करीत 10 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यातील 8 जन हे परंडा येथील आहेत तर 2 जन बार्शी येथील आहेत. बार्शी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असुन 3 आरोपी फरार आहेत, ड्रग्ज तस्करीचे जाळे मोठे असुन परंडा येथील अनेकजन यात रडारवर आहेत. तुळजापूर येथे 36 आरोपी निष्पन्न झाले असुन 14 जन अटकेत आहेत तर 22 जन फरार आहेत. ड्रग्ज तस्करीमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत असुन तस्करावर कारवाई होणे गरजेचे आहे.
परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर व हसन चाऊस या 5 आरोपीना अटक केली आहे तर जमीर अन्सार पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या 2 जणांचा समावेश आहे. उर्वरित 3 आरोपी फरार असुन पोलिसांनी नावे गोपनीय ठेवली आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर 3 जणांना अटक केली. असद देहलूजकडे 9.19 ग्रॅम ड्रग्ज 5 पुड्या व पिस्टल, मेहफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.
ड्रग्ज कुठून आणले होते व कोणाला दिले जाणार होते, पुरवठादार कोण? गावठी पिस्टल कोणाकडुन आणले त्याचा वापर इतर गुन्ह्यात झाला का? आरोपीचे मोबाईल, कॉल डिटेल, सोशल मीडिया यासह अन्य बाबी तपास, अमली पदार्थ व शस्त्र विक्रीचा व्यवहार, इतर साथीदार याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.