परंडा – समय सारथी, किरण डाके
परंड्यातील ड्रग्ज माफीया संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा प्रण माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. परंडा शहरासह तालुक्यातील काही भागात ड्रग्ज आणि इतर अमली पदार्थांची राजरोसपणे तस्करी होत असून ड्रग्ज माफिया वेगाने फोफावत आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांसह काही आरोपीना बार्शी पोलिसांनी अटक केली होती परंतु हे पुरेसे नसून आपल्या राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी या विषारी ड्रग्जच्या विळख्यात सापडू नये यासाठी सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परांडा येथे नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
बार्शी ड्रग्ज तस्करीतील आरोपींची संख्या 10 झाली असुन त्यातील 8 जन परंडा येथील आहेत तर 2 जन हे बार्शी येथील आहेत. 10 पैकी 7 जन अटक असुन 3 जन फरार आहेत. परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर व हसन चाऊस या 5 आरोपीना अटक केली आहे. बार्शी येथील जमीर अन्सार पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या 2 जणांचा समावेश आहे. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर 3 जणांना अटक केली नंतर 23 एप्रिलला 4 नावे निष्पन्न झाली. असद देहलूजकडे 9.19 ग्रॅम ड्रग्ज 5 पुड्या व पिस्टल, मेहफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.