धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग व इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी फेटाळला. जामीन का नाकारला, व कोर्टाने काय निरीक्षण नोंदविले हे ऑर्डर आल्यावर कळणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात ठाम भुमिका मांडली. या दोन्ही आरोपीना दिलासा मिळाला नसुन तस्करीतील 36 पैकी तब्बल 22 आरोपी गेली 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून फरार आहेत, त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज आहे. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे याच्या अटकपुर्व असे 7 जणांच्या जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याच्या अटकपुर्व जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी पोलिस यंत्रणा व तपासावर गंभीर आरोप करण्यात आले. मिटू ठाकुर याने पोलिसांविरोधात आवाज उठवला, पोलिस करीत असलेल्या चुकीच्या, बेकायदेशीर कृत्याची वारंवार पोलखोल केली, त्यामुळे अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी याचे निलंबन व इतर कारवाई झाली. नळदुर्ग भागात तस्करीसह अवैध धंदे ठाकुर याने बंद पाडले, वेळोवेळी निवेदन दिले, या सामाजिक कार्यामुळे पोलिसांनी आकस ठेवते त्याला नेहमी टार्गेट केले असे युक्तिवाद ऍड अमोल वरुडकर यांनी कोर्टात केला होता.
फरार आरोपीला गंभीर व दुर्धर आजार असल्याने आणि अनेक मुद्याच्या आधारे त्याला जामीन द्यावा अशी विनंती कोर्टात करण्यात आली. पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज हे नॉन कमर्शियल श्रेणितील असुन पोलिस जाणीवपूर्वक 3 वेळेस जप्त ड्रग्जची एकत्रीत मात्रा वाढवली आहे. पुरावे नसताना पोलीस आरोपीना गुंतवण्याचा प्रयत्न करीत असुन चार्जशीट दाखल झाले आहे, मुख्य आरोपी अटकेत आहे. पोलिसाचा तपास झाला आहे त्यामुळे आरोपीला अटक करुन त्याच्या कस्टडीची गरज नाही. काही निर्दोष लोकांना यात चुकीच्या पद्धतीने गुंतवण्यात आले असल्याचा युक्तिवाद ऍड विशाल साखरे यांनी केला होता.
फरार आरोपी (22) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारागृहातील आरोपी (14) – यातील अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.