धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 9 आरोपीनी जामिनासाठी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालययात अर्ज केला असुन त्यातील जेलमधील 6 आरोपीनी नियमित तर 3 आरोपीनी अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे, या सर्व प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वतीने लेखी म्हणणे सादर केले असुन 19 एप्रिलला सुनावणी होणार आहे. ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 22 आरोपी फरार आहेत तर 14 जन धाराशिव येथील जेलमध्ये आहेत. पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दाखल केले असुन काही फरार आरोपी चार्जशीट दाखल होण्याची वाट पाहत होते आणि त्यानंतर त्यांच्या नजरा जामीनीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे यांनी अर्ज केला आहे तर फरार आरोपी वैभव गोळे, इंद्रजीत मिटू ठाकुर यासह कायदेशीर बंधन असल्याने अन्य एक गोपनीय नाव असलेल्या आरोपीने अर्ज केला आहे. आरोपीच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड विशाल साखरे, ऍड अमोल वरुडकर, ऍड रामेश्वर सुर्यवंशी हे बाजु मांडत आहेत.
फरार आरोपी (22) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारागृहातील आरोपी (14) – यातील अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.
असा आहे घटनाक्रम (36) – तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली, त्यानंतर 15 एप्रिलला कोर्टात 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना आरोपी करण्यात आले.