उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ४८.०२ टक्के मतदान
६७८४२ पैकी ३२५७६ जणांनी बजावला मतदानाचा हक्क
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात नावलौकीक प्राप्त असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी ६७ हजार ८४२ मतदारांपैकी ३२ हजार ५७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची एकूण सरासरी ४८.०२ टक्के असून दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीतून बंद केले आहे. मतदारांच्या भवितव्याचा निकाल २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले असुन हे विजयाचा फैसला करणार आहेत.
या निवडणुकीत नागदे-मोदाणी पॅनलचे उमेदवार नागदे-मोदाणी-शिंदे पॅनलमध्ये उस्मानाबाद तालुका गटातून विश्वास शिंदे, वसंतराव नागदे, आशिष मोदाणी, उर्वरित उस्मानाबाद जिल्हा गटात तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर, प्रदीप पाटील, उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेरील महाराष्ट्र गटात वैजिनाथ शिंदे, निवृत्ती भोसले, सुभाष धनूरे, महाराष्ट्र बाहेरील गटात नंदकूमार नागदे, महिला गटात पंकजा पाटील, करूणा पाटील, मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती गटातून राजीव पाटील तर उस्मानाबाद जनता बॅक सभासद व कर्मचारी परिवर्तन पॅनल व अपक्ष उमेदवार उस्मानाबाद तालुका गट सुधीर पाटील, विनोद गपाट, पिराजी मंजुळे मोहित उस्मानाबाद जिल्हा गट विकास कोंडेकर व सिद्धेश्वर पाटील अपक्षतर महादेव लोकरे, उस्मानाबाद जिल्हा बाहेरील महाराष्ट्र गट अभिषेक आकनगिरे, दिलीप देशमुख, नितीन कवठेकर नरोद्दीन काझी महाराष्ट्र बाहेरील गट सीताराम जाधव, आर्थिक दुर्बल गट पांडुरंग धोंगडे अनुसूचित जाती गट यशवंत पेठे, महिला गट सुचिता काकडे, सरिता शिंदे आदी उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
एकूण झालेले मतदान- टक्केवारी (जिल्हा निहाय)
उस्मानाबाद जिल्हा – 13254 (56.61%)
लातूर जिल्हा – 11864 (44.06%)
सोलापूर जिल्हा – 3583 (38.37%)
बीड जिल्हा – 2370 (46.27%)
बिदर जिल्हा – 1505 (49.52%)
सर्व जिल्हयातील झालेले एकूण मतदान
32576 (48.02℅)