धाराशिव – समय सारथी
भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात डॉन असलेल्या निलेश घायवळ व पैलवान सागर मोहोळकर विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारहाणीचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला असुन त्यात घायवळ याच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट दिसते. पैलवान सागर हा चालत आला आणि अचानक हात उचलत त्यांच्या गालात मारली. निलेश बॉसचे खच्चीकरण करण्यासाठी हा प्रकार ठरवून केल्याचे बोलले जात आहे.
पैलवान सागरने कुस्तीच्या मैदानात बॉस निलेशच्या चापट मारली होती त्यानंतर पैलवान याला घायवळ याच्या समर्थकांनी यथेच्छा मारहाण केली, या दोघांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकारणी भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) नुसार गुन्हा नोंद केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर खळबळ उडली त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत गुन्हा नोंद केला. धाराशिव जिल्ह्यात घायवळवर यापुर्वीही वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.