एसटीचा संप सुरूच – उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 19 चालक व वाहक कामावर हजर
लढा विलीनीकरणाचा – अद्याप 2 हजार 368 कर्मचारी संपात सहभागी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद,उमरगा,भूम,तुळजापूर,
एसटी कर्मचारी संपामुळे उस्मानाबाद, उमरगा,भूम,तुळजापूर,परंडा व कळंब हे 6 आगार वाहतुकीसाठी बंद आहेत. संपात सहभागी झाल्यामुळे उस्मानाबाद विभागातील 15 चालक, 34 वाहक, 5 यांत्रिकी, 1 लिपिक व 1 वाहतूक निरीक्षक असे 56 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. 6 वाहक व 1 चालक यांना सेवा समाप्तीची नोटीस दिली होती त्यापैकी 6 वाहक हजर झाल्याने त्यांची नोटीस रद्द करण्यात आली आहे तर 1 चालक नोटीस देऊनही हजर न झाल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
उस्मानाबाद,भूम व तुळजापूर या तीन आगारातील एकही चालक-वाहक कामावर हजर झाला नाही तर उमरगा आगारातील 3 वाहक, कळंब आगारातील 3 वाहक, परंडा आगारातील 1 चालक व 3 वाहक तर विभागीय कार्यशाळातील 3 चालक व विभागीय कार्यालयातील 6 चालक कामावर रुजू झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हजेरीपटावर कर्मचाऱ्यांची संख्या 2766 असून अद्याप 2368 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तर 323 रुजू झाले आहेत यात यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील कर्मचारी अधिक आहेत.