उस्मानाबादची सुवर्ण कन्या पोर्णिमा खरमाटे , कुस्ती स्पर्धेत पदक
उस्मानाबाद – समय सारथी
औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित करण्यात आले होते 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद मुक्कामी 15 वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये उस्मानाबादची युवती पंधरा वर्षाखालील वयोगटात कुस्तीगीर पोर्णिमा प्रभाकर खरमाटे हिने 62 किलो वजनीगटात प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. अटीतटीच्या सामन्यात पोर्णिमा हीने सुवर्ण पदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले व उस्मानाबाद जिल्ह्याची शान वाढवली आहे.
पोर्णिमा ही शरद पवार हायस्कुलमध्ये सध्या दहावीत शिकते. तर सह्याद्री कुस्ती संकुलात पुणे येथे कुस्ती प्रशिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षात तिने विविध पदकांची कमाई केली होती. पोर्णिमाच्या सार्थ निवडीबददल शासकिय क्रिडा मार्गदर्शक संदिप वांजळे सर,कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव पै.वामनराव गाते , मार्गदर्शक गोविंद घारगे ,सुंदर जवळगे, शरद पवार हायस्कूल चे मुख्याध्यापक एस बी चौधरी, राष्ट्रीय कोच संदीप पठारे, विजय बराटे,उदय काकडे, जाधवर वस्ताद व उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .
पुढील सामने झारखंड रांची येथे 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये येथे होणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व खेळाडू उस्मानाबाद कर या होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पोर्णिमाला शुभेच्छा दिल्या.
सुवर्णकन्या पोर्णिमा प्रभाकर खरमाटे हिने या आधी 2019 मध्ये आळंदी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल पटकावून राष्ट्रीय खेळाडू याचा मान मिळवून उस्मानाबाद ची शान वाढवली होती तसेच यादी 2017 मध्ये अकोला येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तिने ब्राँझ मेडल पटकावले होते तर 2018 वर्धा येथे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल पटकावण्याचा मान ही तिला मिळाला आहे या सर्व यशामागे तिचे वडील मार्गदर्शक प्रभाकर खरमाटे उस्मानाबाद कुस्ती परिषदेचे सचिव वामन गाते, उपाध्यक्ष संतोष नलावडे, तसेच शरद पवार हायस्कूलचे संस्थापक विजय दंडनाईक यांचे मोलाचे योगदान आहे