धाराशिव – समय सारथी
सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून महिलासह अन्य प्रवाशांना मारहाण करीत लुट केल्याची घटना कावलदरा येथील परिसरात पहाटे 4 च्या दरम्यान घडली घडली आहे. या दरोड्याचा थरार CCTv मध्ये कैद झाला असुन 5 ते 6 जणांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करीत लुट केली यावेळी इतर वाहने रस्त्यावरून जात होती मात्र कोणीही गाडी थांबवली नाही. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
रात्री जवळपास 4 ते 5 गाड्याना अडवून त्यातील महिला व प्रवाशी यांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडील सोने, मोबाईल व इतर वस्तू लुटून नेल्या आहेत. या गाड्या धाराशिवसह बाहेरील जिल्ह्यातील आहेत. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लुट केली असुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु आहे. धावत्या वाहनासमोर काही तरी टाकून टायर फोडण्यात आले त्यानंतर वाहने थांबली आणि लुट करण्यात आली. वाहनाची टायर फोडण्यात आल्याने अपघात होता होता वाचला, या घटनेने प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे.