डान्सबारवर छापा – 25 महिलांसह 64 पुरुष ताब्यात, उस्मानाबाद पोलिसांची
कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगा या डान्सबारवर
उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने छापा टाकून 25 महिलांसह 64 पुरुष, 2
मॅनेजर व मालकास अटक केली आहे. उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन
यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली. कळंब विभागाचे
उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या
नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
तुळजापूर येथील येथे गजगा डान्स बार सुरु झाल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई
आहे. यात 25 महिला व 64 पुरुष यांना अटक करण्यात आली आहे, अटक करण्यात
आलेल्या सर्व महिला या परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे तर
अटक करण्यात आलेले पुरुष हे ग्राहक असुन ते सोलापूर,गुलबर्गा, कर्नाटक
राज्यासह अन्य भागातील आहेत.
डान्सबारमध्ये विभतस वर्तन करणे यासह रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरु ठेवणे
यासह इतर कारणामुळे कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम
294,208,269,188 यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.