विश्वासातून प्रगतीकडे – श्री सिद्धिविनायक ॲग्रोटेक इंडस्ट्रीच्या पहिल्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ
उस्मानाबाद – समय सारथी
श्री सिद्धिविनायक ॲग्रोटेक इंडस्ट्रीच्या पहिल्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ 30 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. विश्वासातून प्रगतीकडे असे ब्रीदवाक्य असलेल्या सिद्धिविनायक समूहाने संस्थापक दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथे कारखाना सुरू केला असून त्याचा पहिला गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर, तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजीबुवा, विधानपरिषद सदस्य सुरेश धस, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या शुभहस्ते गळीत चाचणी हंगाम होणार आहे. या कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बालाजी कोरे, विशाल रोजकरी,ऍड प्रतिक देवळे, गणेश कामठे,राजकुमार जाधव,दिनेश कुलकर्णी व प्रथमेश आवटे यांनी केले आहे.