रुग्णांची लुट – आरोपी बनसोडेचा जामीन अर्ज फेटाळला, जेलमधील मुक्काम वाढला तर फरार डॉ शेंडगेच्या अटकेचा मुहुर्त कधी ?
उस्मानाबाद – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याच्या प्रकरणी उमरगा येथील डॉ आर डी शेंडगे हॉस्पिटलचे तत्कालीन लॅब टेक्निशियन आरोपी तानाजी बनसोडे यांचा जामीन अर्ज उमरगा न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांचा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहमधील मुक्काम तूर्तास वाढला आहे. उच्च न्यायालयात जामीन मिळत नसल्याचे लक्षात येताच बनसोडे हा पोलिसांना नाट्यमयरित्या शरण आल्यानंतर त्याला अटक केली होती. 29 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती ती संपल्यानंतर जामीनासाठी अर्ज केला मात्र ती फेटाळून लावण्यात आला. या लुटीतील व घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ आर डी शेंडगे हे अद्याप फरार आहेत. 12 ऑक्टोबरला गुन्हा नोंद झाल्यापासुन मुख्य आरोपी डॉ शेंडगे हे अजून फरार आहेत ते पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉ शेंडगे यांना अटक करण्यासाठी पोलीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत.
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे संचालक डॉ आर डी शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज या अगोदरच उमरगा कोर्टाने फेटाळून लावला आहे. तीन सदस्यच्या समितीसमोर आलेले डॉक्टरचे हस्ताक्षर आणि डॉक्टर यांनी बनसोडे यांच्याकडे दिलेल्या कागदावर असलेले हस्ताक्षर यात तफावत दिसून आली. डॉ शेंडगे यांनी किती कोटी रुपयांचा घोटाळा केला ? किती व कोण कोणत्या विमा कंपन्याकडून फायदा करून घेतला यासह अन्य कारणास्तव डॉ आर डी शेंडगे यांची अटकपूर्व जामीन अर्ज उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी २६ आक्टोबर रोजी फेटाळला तर त्यानंतर शेंडगे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र तो परत घेतला तेव्हापासून ते फरार आहेत.
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले.
सर नमस्कार. सर प्रलंबित फौजदारी खटल्यातील पाहिजे (फरार) ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेणे बाकी आहे आणि दोषरोपपत्र पाठवणे असल्याने काही दिवस पोलिस कस्टडी रिमांड मिळणेस विनंती न्यायदेवता कडे केले होते.सदर दोषरोपपत्र दाखल केले कोर्ट नंबर आर सी सी १०००(४७७) प्रमाणे उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट २ वर्ग . सदर हा गुन्हा उल्हासनगर ०१ पोलिस स्टेशन ची दिनांक २१/०१/२०१३ रोजी Fi r नंबर i 23/2013.आणि ८ आरोपींना तब्यात खेऊन कोर्टात दिनांक २२ आणि २३/०१/२०१३ रोजीची पोलिस रिपोर्ट जावक नंबर ४७१ आणि ४९८. या तेल पाहिजे आरोपी बाबत वरील कोर्ट नंबर ४७७ प्रमाणे शासन मान्य आपले सरकार पोर्टल मध्ये ऑनलाईन तक्रार दाखल केले. मात्र मला सुचान पत्र देण्यात आले की अभिलेख तपासणीत कोर्ट नंबर ४४७ प्रमाणे पाहिजे आरोपींना गुन्हे प्रकटीकरण पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. सदर वरील विनंती आणि आदेशाचा तफवात मुळे स्थानिक पोलिस स्टेशन ला अपयश येत आहे. सदर असे पाहिजे आरोपी शहरात रोजरोस पणे शहरात फिरत असल्याने पोलिस तपासवर शंका येत आहे.