धाराशिव शहरात नवीन बस स्थानक मंजुर करावे – पालकमंत्री डॉ सावंत यांच्याकडे शिवसेना युवा नेते आनंद पाटील यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील बसस्थानक हे जुने व जीर्ण झाले असून त्यामुळे प्रवाशाच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या बसस्थानकात सोयी सुविधांचा अभाव असून प्रवाशांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे धारशिव शहरातील नवीन बस स्थानक मंजूर करावे अशी मागणी शिवसेना युवानेते आनंद पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील एकमेव बसस्थानक असणारे हे अत्यंत जुने झाले असून धोकादायक बनलेले आहे. येथे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक येत असतात. या बसस्थानकामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव असून विविध प्रकारच्या त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागते. आपल्या मार्फत नवीन बस स्थानक व्हावे ही जिल्हयातील नागरिकांची इच्छा आहे. नवीन होणाऱ्या बस स्थानकामध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रतीक्षाकक्ष, जेष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीकक्ष, तसेच विविध सुखसुविधा नागरिकांना देण्यात याव्यात.
विशेष म्हणजे मागील नवीन बस स्थानकाचे उद्घाटन केले होते परंतु पुढे काहीही झाले नाही त्यामुळे धाराशिव शहराला नवीन सुसजन बसस्थानक देवून धाराशिव जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल. आपण संबंधीत विभागाची बैठक घेवून बसस्थानक मंजूर करावे अशी मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे आनंद पाटील यांनी केली आहे.