दिलासा – शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही
वाटचाल कोरोनामुक्तीकडे – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 16 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे अमिक्रोन या कोरोनाच्या नवीन व्हायरसची भीती असताना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शुक्रवारचा दिवस हा दिलासादायक ठरला आहे. शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही तर 3 रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात 956 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकी एकही जण पॉझिटिव्ह सापडला नाही, बऱ्याच दिवसानंतर असे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या केवळ कोरोनाचे 16 सक्रिय रुग्ण असुन जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होताना दिसत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 67 हजार 764 रुग्णपैकी 65 हजार 584 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के आहे तर 67 हजार 619 पैकी 1 हजार 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.34 टक्के इतके आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाने 2 हजार 76 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात 1501 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 16 सक्रिय रुग्ण असून जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असली तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.