माळी यांच्या प्रकरणात लक्ष घालुन कारवाई करू – पालकमंत्री गडाख
खासदार ओमराजे यांचा अधिकारी यांना निवडणुक लढविण्याचा सल्ला
हक्कभंगाचे अस्त्र – तहसीलदार गणेश माळी यांच्यावर कारवाई होणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील तहसीलदार गणेश माळी यांच्या गैरवर्तणूकीबाबत अनेक तक्रारी आल्या असून हे अपेक्षित नाही त्यामुळे याची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिले. ज्याची चूक असेल त्याला समज दिली जाईल व गंभीर चुक असेल तर कारवाई केली जाईल. शासकीय अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी यांचे ऐकले पाहिजे, अधिकारी यांना अडचण येत असेल तर त्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. माळी यांच्याबाबत मी व्यक्तिक लक्ष घालून योग्य त्या सूचना संबंधित अधिकारी यांना देईल असे पालकमंत्री गडाख म्हणाले. तहसीलदार माळी यांच्या बाबत तक्रार असल्याने पूर्ण प्रशासन याला दोष देणे योग्य ठरणार नाही, माळी यांचे बोलणं सुधारणा करणे गरजेचे असल्याचा सल्ला खासदार ओमराजे यांनी दिला या प्रकरणात हक्कभंग समिती योग्य निर्णय घेईल असे ते म्हणाले.
गणेश माळी यांच्या वर्तवणुकीबाबत खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पाढा वाचला. माळी यांनी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांशी उद्धटपणे वागले याच्या तक्रारी पाहणी दौऱ्यात आल्या, शेतकऱ्यांना घरचे द्यायचे आहे असे ते वागले त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती मदत देता आली नाही व शासनाची बदनामी झाली असे आमदार पाटील म्हणाले. माळी यांच्यावर कारवाईचे आश्वासन पालकमंत्री गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे ऐकत नसल्याने खासदार ओमराजे यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्याचा दिलेल्या सल्ल्याची पत्रकार परिषदेत चांगलीच चर्चा झाली.
उस्मानाबाद येथील तहसीलदार गणेश माळी यांच्यावर हक्कभंगासह व नागरिकांना अर्वाचच भाषेत शिवीगाळ आणि मारहाण करणेसह प्रशासकीय कामात दप्तर दिरंगाईची लेखी तक्रार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील यांनी महसुल विभागाच्या सचिवांकडे केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची गावनिहाय, क्षेत्र व पिकनिहाय माहिती आमदार कैलास पाटील यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे मागितली होती परंतु ती माहिती तहसील कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाही. माळी यांनी जाणीवपूर्वक विधानसभा सदस्याचा अवमान केला आहे त्यांच्या अशा उद्धट वागण्याने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या कामात अडथळा झाला. विधानसभा सदस्याला अशा प्रकारे दुर्लक्षीत करणे, सन्मानपूर्वक वागणूक न देणे ही बाब हक्कभंग करणारी आहे त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी.
तहसीलदार गणेश माळी यांच्याबाबत शासकीय कामे, तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, जाणीवपूर्वक प्रकरणे प्रलंबित ठेवून दप्तर दिरंगाई करणे, वाद घालणे, नागरिकांना मारहाण करणे अशा तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून माळी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.