महाडाची परीक्षा रद्द , पेपरफुटी प्रकरणी 3 अटकेत – सरकारवर पुन्हा एकदा नामुष्की
पुणे – समय सारथी
पोलिसांनी म्हाडा नौकर भरतीच्या परीक्षा पेपर फुटीच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही सुरू असून मोठे मासे गळाला लागले आहेत.आरोग्य भरतीच्या पेपर फुटीनंतर महाडा परीक्षामध्ये ही पेपर फुटणार होता अशी माहिती मिळाल्यावर ही कारवाई केली. सायबर पोलिसांच्या सातर्कतेने व MPSC समनवय समितीच्या पाठपुराव्यला यश आले आहे. तीन ही आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्या करिता सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार होती. यासाठी 12 डिसेंबर,15 डिसेंबर,19 डिसेंबर व 20 डिसेंबर या 4 टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक बाबींमुळे पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेचा वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळवला जाईल अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांनी दिलीं आहे.
आरोग्य भरतीच्या गट ड आणि क च्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांच पथक बीडमध्ये आहे.मराठवाड्यातून पेपर फुटल्यानं पथक मराठवाड्यातचं तळ ठोकून आहे. महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे यांना अटक केली असून 15 जणांना अटक केली आहे. आरोग्य भरतीचा पेपर 100 जणांपर्यत गेल्याची शक्यता असुन किती पैसे घेण्यात आले याचा तपास सुरू आहे.