लातूर येथे ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला , उस्मानाबादचा अहवाल प्रलंबीत
लातूर – समय सारथी
राज्यात आज ओमिक्रॉनच्या रुग्णाच्या रुग्णसंख्येत 2 जणांची भर पडली. पुणे आणि लातूर मधील रुग्णांचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.पुण्यात दूबईवरून आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर लातूर येथे दुबईहुन आलेल्या 35 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांचे लसीकरण झाले होते. लातूर येथील रुग्ण दुबई येथून आला होता त्याच प्रमाणे उस्मानाबाद येथील बावी गावातील तरुण हा दुबई जवळील शारजा येथून आला होता.त्यामुळे अहवाल येईपर्यंत चिंतेत भर पडली आहे.
लातुर जिल्ह्यात ओमीक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दुबई वरून परतलेल्या 35 वर्षीय रुग्णांत आढळली लक्षणे त्यानंतर त्याला लातुर मनपाच्या कोविड सेंटरमध्ये ओमीक्रोनच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे व लातुरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. परदेशातुन आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब पाठवला होता तो ओमीक्रोन पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती असून रुग्ण लातुर जिल्ह्यातल्या औसा येथील रहिवाशी आहे.पुण्यातील रुग्णाच्या संपर्कातील 3 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे ही बाब दिलासादायक आहे.