उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट झाल्यानंतर व त्यापूर्वी या भेटीची तर्कवितर्क लावत जोरदार चर्चा झाली. सावंत यांच्या पुणे कात्रज येथील घरी संभाजी महाराज व सावंत याची भेट झाली. सावंत यांनी संभाजी महाराज यांचा यथोचित सन्मान करित स्वागत केले यावेळी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे उपस्थित होते.
या भेटीपुर्वि काही वृत्त वाहिनी यांनी तर थेट सावंत भाजप प्रवेशाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असे जाहीर केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत सावंत यांची तासभर चर्चा झाली,या चर्चेत मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. सरकार सोबत चर्चा करू असे आश्वासन संभाजी राजे यांनी दिले. मराठा आरक्षण बाबत आंदोलन किंवा कायदेशीर लढाई लढायचं १९ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात आमदार डॉ तानाजीराव सावंत लवकर पत्रकार परिषद घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान आत्महत्या केलेल्या शाहिद तरुणांच्या कुटुंबाला आमदार सावंत यांनी भेट घेत आर्थिक मदत केली होती तसेच अनेक शेतकरी मुलींचे विवाह लावून देण्यासाठी विवाह सोहळे घेतले होते.
मराठा आरक्षण मुद्यावर ही भेट झाल्याचे जाहीर केले असले तरी सावंत शिवसेनेत नाराज असल्याची व त्यामुळे भाजपमधिल संभाव्य प्रवेशाची व तर्कवितर्क याचीच चर्चा जास्त झाली.