धाराशिव – समय सर्थी
लाच घेतल्याच्या आरोपातुन रेशीम उद्योग सहाय्यक अधिकारी रत्नदिप भुजंगराव गंगावने यांची धाराशिव येथील विशेष सत्र न्यायाधिश श्री राजेश गुप्ता साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. ऍड विश्वजीत शिंदे यांनी आरोपीच्या वतीने बाजु मांडली
तक्रारदार यांनी 8 जानेवारी 2019 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव येथे आरोपी विरुद्ध तक्रार दिली की, रेशीम कीटक संगोपन ग्रहाची उभारणे करणे तुती लागवड व संगोपन इत्यादी कामे झाले आहेत मात्र मनरेगा अंतर्गत बिल काढण्यासाठी सहाय्यक अधिकारी गंगावणे हे कामासाठी वारंवार पैशाची मागणी करत आहेत. बिले काढण्यासाठी तक्रारदाराकडे आरोपीने साडेसात हजार रुपये लाचेची मागणी केली आहे आणि 7 ते 8 हजार रुपये घेऊन आठ ते दहा दिवसात ऑफिसला ये असे आरोपीने तक्रारदारास सांगितले. तक्रारदार त्याच्या वडिलांच्या कामाबद्दल आरोपीला बोलणार आहे आणि आरोपीने पैसे मागितल्या मुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दोन शासकीय पंच बोलवून घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीच्या विरोधात सापळा रचला, त्यामध्ये वाईस रेकार्डर वापरून व लाचेच्या नोटावर पावडर लावून सापळा अँटी करप्शन विभागाने यशस्वी केला. तडजोडी करुन साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले व पुढील कारवाई केली.
सरकार पक्षा तर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. या सर्वांचा उलट तपास ज्येष्ठ विधीज्ञ ॲड विजयकुमार भगवानराव शिंदे यांनी केला तर तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती दिपाली मुधोळ – मुंढे यांचा उलट तपास ॲड. विश्वजीत शिंदे यांनी केला. बचाव पक्षा तर्फे जेष्ठ विधिज्ञ ॲड. विजयकुमार शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, सबळ पुराव्या अभावी धाराशिव येथील विशेष सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयाने आरोपी रत्नदीप गंगावणे याची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात ॲड. विजयकुमार शिंदे यांना ॲड. विश्वजीत शिंदे, ॲड. अजित राठोड, ॲड. भाग्यश्री रणखांब, ॲड. ज्योती जगताप, पवनराजे पांचाळ यांनी सहकार्य केले. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.