धाराशिव – समय सारथी
तुळजापुरात पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्ज 6 ग्राम ड्रग्ज जप्त केले असुन शुक्रवार पेठेतील संकेत अनिल शिंदे याला अटक केली आहे. 30 हजार रुपये अशी या जप्त ड्रग्जची किंमत आहे. न्यायालयाने त्याला 18 मार्च पर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तुळजापूर येथे पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 7 जण पोलिस कोठडीत आहेत. ड्रग्जची पाळेमुळे तुळजापुरात खोलवर रुजली असुन ‘आका’ व ‘बोका’ यांना पोलिसांनी अजुन पडकले नाही.
तुळजापूरात विक्री अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स गुन्ह्याचा तपास सुरु असताना धाराशिव पोलिसांनी आरोपीकडुन 2 वेळेस एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. 3 ड्रग्ज तस्करांकडुन 17 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करीत अटक केली आहे, त्या तिन्ही आरोपीना 17 मार्चपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची राज्यभर चर्चा व पोलिस तपास सुरु असताना पोलिसांनी 2 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे.
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे मोठे सिंडीकेट सक्रीय असल्याच्या पोलिसांच्या कोर्टातील दाव्याला यानिमित्ताने पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे या 3 जणांना ड्रग्जसह अटक केली आहे, हे तिन्ही आरोपी ड्रग्ज साठवणूक करीत विक्री करीत होते. ड्रग्जसह आरोपी अटक करणे हे पोलिसाचे मोठे यश आहे. आरोपीनी हे ड्रग्ज विक्रीसाठी ठेवले होते. कोर्टाने हे रॅकेट प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे यांना आरोपी करण्यात आले.सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे यांना ड्रग्जसह अटक करण्यात आली.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची साखळी उघड होत आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असुन तुळजापुरातील अनेकांनी कौतुक करीत ड्रग्जची कीड साफ करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.