धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज माफिया पुर्णत: नष्ट करून कुणाला ही पाठीशी न घालता कारवाई केली जाईल असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले. जिल्ह्यातील काही प्रमुख राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांवरती पोलीसांनी अद्यापपर्यंत पुर्णत: कारवाई केलेली नाही.यातील मुख्य सुत्रधार (आका) याच्याशी आर्थीक लागेबंधे असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही असा आरोप केला.
श्रीक्षेत्र तुळजापूर व धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचे लोन मोठ्या प्रमाणात पसरले असुन अनेकजण ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले आहे. दोन ते तीन हजार तरूणाला याचे व्यसन लागल्याचे कळते. तुळजापूर शहरातील सर्व पुजारी व नागरीकांनी निवेदन देवून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तरपणे चर्चा करून या आमली पदार्थाच्या विक्रेत्यांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली होती. या ड्रग्जप्रकरणी पालकमंत्र्याच्या 72 तासात कठोर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,जिल्हासंघटक सुधीर आण्णा पाटील,नाशिकचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गणेश कदम,रत्नागिरीचे संपर्कप्रमुख सुधीर कदम,धाराशिवचे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,तुळजापूर तालुका उपप्रमुख खंडु कुंभार यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन दिले.