धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे पोलिसांनी 2 वेळेस कारवाई करीत 74 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त केले. सुरुवातीला 59 पुड्या जप्त केल्या त्यात कारवाई करीत 12 जणांना आरोपी केले. तुळजापूरातील ड्रग्जची राज्यभर चर्चा सुरु असतानाच पुन्हा कारवाई करीत 3 आरोपीना अटक करीत 17 पुड्या ड्रग्ज जप्त केले. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 15 आरोपी असुन या दोन्ही कारवाईवरून ड्रग्जची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे दिसते, सामाजिक विषय म्हणुन ही चिंतेची बाब आहे. तुळजापूर येथे अशीच भविष्यात स्तिथी राहिली तर नेतृत्वाच्या संकल्पनेतील शास्वत विकास प्रत्यक्षात अवतरण्या आधी अत्याधुनिक सुविधा असलेले ड्रग्ज व्यसनमुक्ती केंद्र इथे सुरु करावे लागेल, त्यासाठी पण ते वेगवेगळे जागतिक दर्जाचे मॉडेल सांगुन योगदान देती यात तीळमात्र शंका नाही. ड्रग्ज हा सामाजिक विषय आहे, त्याचा प्रवास कोणाच्या चितेपर्यंत जाण्या आधी ठोस भुमिका व प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे, यासाठी सगळ्यांचे योगदान अपेक्षित आहे. पोलिस व न्यायव्यवस्था याबाबत गंभीर असताना काही राजकीय नेते मात्र त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना न देण्यात धन्यता मानत आहेत. विकास नको पण ड्रग्ज आवरा, आमची पिढी वाचवा अशी आर्त हाक इथल्या माता भगिनी देत आहेत
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे मोठे सिंडीकेट सक्रीय असल्याच्या पोलिसांच्या कोर्टातील दाव्याला या दोन्ही कारवाई निमित्ताने पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे या 3 जणांना ड्रग्जसह अटक केली आहे, हे तिन्ही आरोपी ड्रग्ज साठवणूक करीत विक्री करीत होते, तुळजाभवानी देवीच्या महाद्वार शेजारी असलेल्या एका लॉजवर यांचा ठिकाणा होता, ती मालमत्ता जप्त करण्याची गरज आहे.
ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना आरोपी केले असुन त्यातील 9 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 6 जण पोलिस कोठडीत आहेत. तपासात ड्रग्ज तस्करीचा उलघडा होत असुन आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ड्रगज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर असुन सेवन करणाऱ्याच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का ? याचा शोध घेतला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा येथे ड्रग्जचे सिंडीकेट असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा असुन त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे यांना आरोपी करण्यात आले.सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे यांना ड्रग्जसह अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची साखळी उघड होत आहे.