धाराशिव – समय सारथी
राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंच्या राजीनाम्याच पत्र घेऊन सागर बंगल्यावर घेऊन गेले आहेत. बीड येथील संतोष देशमुख क्रूर हत्याकांड प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड व इतर आरोपींची नावे समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी फडणवीसांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे देखील उपस्थित होते, त्यात मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा निर्णय झाला. मुंडे यांच्या राजीनाम्याची सुरुवातीपासुन मागणी होती मात्र टाळाटाळ केली जात होती अखेर सत्याचा विजय झाला आणि मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.