धाराशिव – समय सारथी
बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 5 मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. आज 4 मार्चला बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र अचानक बंद केल्यास व्यापारी, विद्यार्थी, नागरिक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, बंद रद्द करीत उद्या 5 मार्चला बंद पुकारला आहे.
संतोष देशमुख यांना जबर मारहाण व क्रूर हत्या करतानाचे व्हिडिओ, फोटो समोर आल्यानंतर समाजातील सर्व स्तरातील लोक आक्रमक झाले आहेत. ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ते कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे व हैवानी आहे त्यामुळे संताप व निषेध व्यक्त करीत दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी 5 मार्चला धाराशिव बंद ठेवण्यात येणार आहे. सर्वांनी यात सहभागी होऊन निषेध नोंदवावा असे आवाहन केले आहे.