धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजापूर येथील 3 तस्करांना धाराशिव येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्यांची धाराशिव येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स विक्रीसाठी नेताना तामलवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांनी ट्रॅप लावुन 15 फेब्रुवारील अटक केली होती. त्यानंतर त्यांना 5 दिवसांची 20 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली व नंतर 9 दिवसांची 1 मार्च पर्यंत अशी कोठडी सुनावली. 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत त्यांच्याकडुन अनेक धागेदोरे मिळाले आहेत. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी 1 मार्च रोजी कोर्टात बाजु मांडली.
मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांना आरोपी करण्यात आले. त्यातील पिनू तेलंग फरार आहे. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे.