धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे राजकीय टायगर ऑपरेशन मी नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यापुर्वी 2 वेळेस वाघ जाळ्यात अडकला होता मात्र योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्याने सुटला मात्र यावेळी स्वतः शिंदे सावज टप्प्यात आले की कार्यक्रम करणार आहेत असे म्हणाले. पत्रकार यांच्याशी बोलताना त्यांनी सुचक इशारा दिला यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थितीत होते. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटाचे कैलास पाटील व उमरगा येथील प्रवीण स्वामी हे आमदार आहेत. स्वामी हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत मात्र कैलास पाटील यांची ही 2 री टर्म असुन सत्ता परिवर्तन वेळी ते गुवाहटीला जात असताना सुरत च्या अलीकडून वापस आले होते. कैलास पाटील हे शिंदे गटाच्या रडारवर आहेत हे यातून दिसते.
आमच्या पक्षाचे 12 मंत्री आहेत त्यामुळे ऑपरेशन टायगरची जबाबदारी सर्वांची आहे. धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगरचे 2 वेळा प्रयत्न झाले मात्र ते जाळ्यात आले नाहीत, योग्य जागी इंजेक्शन लागले नाही. आता योग्य जागी लागणारे इंजेक्शन तयार करण्यात आले असुन शिकाऱ्याच्या समोर सावज टप्प्यात आले की ते टोचले जाईल. पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठे डॉक्टर आहेत त्यांनी अडीच वर्षापुर्वी डॉक्टर यांचे ऑपरेशन कसे होते हे दाखवून दिले आहे, आताही त्या पद्धतीने कारवाई चालु आहे असे सांगत त्यांनी आगामी काळात शिवसेना उबाठा गट फोडण्याचे संकेत दिले.