नाराजीचा सुर – नगराध्यक्ष जाकीर सौदागर राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा
परंडा – समय सारथी , किरण डाके
राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या परंडा दौऱ्या नंतर परंडा शहरातील राजकीय उलथापालथ होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या परंडा शहरात नगराध्यक्ष जाकीर सौदागर राष्ट्रवादी सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे मात्र या चर्चेला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना डावलून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेला परंडा दौरा राजकीय क्षेत्रात खळबळ उडवुन देनारा ठरला आहे यामुळे परंडा शहरातील राजकीय उलथापालथ अटळ असल्याचे दिसुन येत आहे तर माजी आमदार राहुल मोटे यांच्या भुमीकेमुळे नाराज असलेले राष्ट्रवादीचे नगर अध्यक्ष जाकीर सौदागर राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ऐन नगर परिषद निवडणूकीच्या तोंडावर जाकीर सौदागर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस सोडल्यास राष्ट्रवादीला मोठे नुकसान होणार असल्याचे दिसत आहे .
माजी आमदार राहुल मोटे यांचे खंदे समर्थक व पक्षनिष्ठ म्हणून जाकीर सौदागर यांची आजपर्यंतची ओळख आहे. राष्ट्रवादीला नगर परिषदेतून हद्दपार करणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना केले होते त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच रोहित पवार व माजी आमदार राहुल मोटे यांनी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यालयात भेट दिली, ही गोष्ट सौदागर यांना खटकल्याने ते नाराज झाल्याची चर्चा शहरात होत आहे.जाकीर सौदागर यांना माननारा मोठा वर्ग परंडा शहरात असून त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय मुल्य आहे.