उदो उदो करण्याचे आदेश , यंत्रणा कामाला – सेमी इंग्रजी बंदबाबत सकारात्मक जनजागृती करा
सेमीला विरोध करा – झूम मिटिंग पुर्वीच पेरणी व व्युहरचना
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व 1083 शाळेत सरसकट सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय कसा चांगला, विद्यार्थी हिताचा आहे हे पटवून सांगत या निर्णयाचा उदो उदो करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. यासाठी काही शिक्षक संघटना व शिक्षक कामाला लागले आहेत. मातृभाषेत संकल्पना चांगल्या पद्धतीने शिकविता येतात व समजावून सांगता येतात,विद्यार्थी यांना कळतात वैगैरे वैगैरे सांगत या निर्णयाची जनजागृती सध्या सुरु आहे. पालकांना भेटून त्यांचे मतपरिवर्तन करून सेमीला विरोध करा असे बिंबविले जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 5 जानेवारी 2022 रोजी झूम मीटिंग द्वारे जिल्ह्यातील 500 शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य मंडळीची बैठक घेतली होती त्यात बहुतांश पालकांनी सेमी इंग्रजी नको असे नमूद केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयात नमूद आहे, मात्र या 5 जानेवारीच्या बैठकी पूर्वी काही शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी व्हाट्स अँपवर सेमीला बैठकीत विरोध करा, विरोध करणारे सदस्य गोळा करा, त्यांना काय बोलायचे व कसे याचे प्रशिक्षण द्या असे संदेश दिले, सर्व काही सेमी विरोधात तयार करून वातावरण निर्मिती करण्यात आली. याबाबतचे काही मेसेज आता व्हायरल झाले आहेत.झूमझूम मिटिंग पुर्वीच पेरणी व व्युहरचना आखण्यात आली होती, अहवालासह सगळं काही नियोजनबद्ध होते असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत केला.
सेमी इंग्रजी बाबत उपस्थित झालेल्या मुद्यावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सरसकट सेमी इंग्रजी बंद बाबत उद्या 27 जानेवारी रोजी गुरुवारी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली. कोरोना नियमामुळे ही सभा ऑनलाईन होणार असून यात जिल्हा परिषद शाळेत सरसकट म्हणजे सर्व शाळेत सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत निर्णय होणार आहे. सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत आम्ही सकारात्मक असून या विषयात कोणतेही राजकारण येणार नाही , राजकीय मतभेद असले तरी लोकांच्या विकासासाठी हिताचा निर्णय घेणार आहोत. सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 1083 शाळेत 2012-13 या शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्रजी सुरु आहे मात्र जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सरसकट सर्व शाळेत सुरु असलेले सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समिश्र प्रतिक्रिया असून ग्रामीण भागात पालकात नाराजीचा सुरु आहे.
विशेष सभा आयोजित केली असून यात सर्व सदस्य यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. सरसकट सेमी इंग्रजीसाठी नेमक्या काय परवानग्या , प्रशिक्षण , सुविधा, त्रुटी याची पूर्तता केली जाईल पाठपुरावा करू, कोणत्याही स्तिथित सर्व शाळेत सुरु असलेले सरसकट सेमी इंग्रजी बंद केले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
संजय पाटील दुधगावकर शिक्षणतज्ञ आहेत का ?
बालमानसशास्त्राचा अभ्यास असणारे किती सेमीसमर्थक आहेत?
पुढील शै.वर्षी येणारा शिक्षण हक्क कायदा मातृभाषेतुनच प्राथमिक शिक्षणाचे समर्थन करतोय.
इंग्रजी भाषा एक विषय म्हणुन पुर्ण महाराष्ट्रात शिकवला जातोय तो आपण कुठं बंद केलाय ? प्रश्न फक्त सहावी,सातवी च्या गणित,विज्ञानाचा आहे.सेमी चालू करताना जेवढा गाजावाजा झाला नाही तेवढा बंद करताना का होतोय कळत नाही.