तुळजापूर – समय सारथी
किलज गावातील ग्रामस्थानी पाठलाग करून एका चोरास पकडण्यास यश मिळवले आहे परंतु त्याचे 4 ते 5 सहकारी हत्यार घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मागील एक ते दीड महिन्यापासून चोरांनी गावात दहशत निर्माण केली होती. ग्रामस्थांनी पकडलेल्या त्या चोराची विचारपूस केली असता, त्याने पुणे येथील विश्रांतवाडी येथील असल्याचे सांगितले. चोराला किलज गावकऱ्यांनी आज पहाटे 4 वाजता नळदुर्ग पोलिस पथकाच्या स्वाधीन केले, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
किलज गावातील ग्रामस्थांनी चोराच्या टोळीचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर गावात चोरांच्या टोळीविरोधात कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे.












