सोलापुर तुळजापुर उस्मानाबाद रेल्वे साठी केवळ 10 कोटींची तरतूद
खासदार ओमराजे निंबाळकर यांची केंद्र सरकारवर टिका
उस्मानाबाद – समय सारथी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या सोलापुर तुळजापूर उस्मानाबाद या 84 किमी रेल्वे मार्गांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पा त केवळ 10 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी जवळपास 1 हजार कोटी लागत असताना केवळ 10 कोटी देण्यात आले असून गेल्या 3 वर्षात 35 कोटी मिळाल्याने याचे काम संथगतीने सुरु आहे.सध्या या रेल्वेमार्गासाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होत आहे.
केंद्रांकडून नुकताच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये उस्मानाबाद तुळजापुर सोलापुर रेल्वे मार्गासाठी फक्त दहा कोटीची तरतुद करण्यात आली आहे. एक हजार कोटीच्या रेल्वेमार्गाला अवघे दहाच कोटी रुपये दिल्याने पुन्हा केंद्र व राज्य यामध्ये असलेला संघर्ष समोर आल्याचे दिसुन आहे. मंजूरीनंतर हा तिसरा अर्थसंकल्प आहे. स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर या 84 किलोमीटर रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. पहिल्या वर्षी पाच कोटी, दुसर्या वर्षी वीस कोटी व आता तिसर्यावर्षी दहा कोटी रुपयाची तरतुद केली आहे. म्हणजे एक हजार कोटीच्या प्रकल्पास आतापर्यंत तीन अर्थसंकल्पात फक्त 35 कोटी रुपयेच देऊ केले आहेत. सध्या या रेल्वेमार्गासाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होत आहे. रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्यास निधीअभावी गती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहेत.एवढ्या महत्वाच्या व अत्यंत गरजेचा असलेल्या रेल्वेमार्गाला केंद्राकडून त्याची अजिबात दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. राज्य व केंद्र यांच्यामध्ये असलेला तीव्र संघर्ष देखील याला कारणीभूत ठरत असल्याचे उघड दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी राज्याचा निम्मा वाटा देण्याची मागणी केली होती त्यावर स्वत: जबाबदार मंत्र्यानी विधीमंडळात असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगुन केंद्राकडे बोट दाखविले होते. तुळजाभवानीसारख पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूरला रेल्वेने जोडली जावी अशी मागणी कित्येक वर्षापासुन आहे. मागणी मंजुर झाली पण तीन वर्षानंतरही त्याला कसलीही गती नसल्याचे दिसुन येत आहे.
केंद्रांकडून पुन्हा या रेल्वेमार्गाच्या आशेवर असलेल्या जनतेच्या तोंडाला पान पुसली आहेत. लोकप्रिय घोषणा करुन वाहवा मिळवायची पण प्रकल्प पुर्ण होण्यासाठी कसलीच कार्यवाही करत नाही, हे दुर्देवी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.