माझी यंत्रणा कार्यरत , मी मतदार संघात हजर राहणे अपेक्षित नाही – आमदार डॉ तानाजीराव सावंत
उस्मानाबाद – समय सारथी
मी मतदार संघात प्रत्यक्ष हजर राहणे अपेक्षित नसून माजी स्वतंत्र यंत्रणा सदैव जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे त्यामुळे ज्याला मदत हवी आहे त्याला ती वेळेवर दिली जाते, कोणतेही काम थांबणार नाही असे स्पष्टीकरण शिवसेना आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत दिले.आमदार सावंत हे भुम- परंडा – वाशी मतदार संघात येत नसल्याने त्यांच्यावर विरोधकांसह सोशल मीडियावर टीका होत होती त्यावर ते बोलत होते.
माझी वयक्तिक उपस्थिती मतदार संघात अपेक्षित धरू नका, हे मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून सांगत आहे. माझे 2 पुतणे मतदार संघात पूर्णवेळ असून 3 संपर्क कार्यालय आहेत आणी त्या माध्यमातून 25 ते 30 कर्मचारी स्टाफ सतत जनतेचे प्रश्न जाणून घेऊन सोडविण्यासाठी 24 तास प्रयत्नशील आहे असे सावंत म्हणाले.
तहसील , पंचायत समिती, पोलीस ठाणे, तलाठी असो तेथील अडचणी बाबत ज्याचा कोणाचा फोन येईल त्यांचं मी ऐकून घेतो व तेथून मी लगेच संबंधिताना बोलतो ही माझी कामाची पद्धत आहे. एखाद्या ऑफिसात जायचं व तिथे आमदारकीच्या थाटात बसायचं, हा बोलतो, करतो असे म्हणून त्याचाच चहा प्यायचा या गोष्टीच्या विरोधात मी पहिल्या दिवसापासून आहे. विकास झाला पाहिले, लोकांची कामे झाली पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे आणी त्या दृष्टीने मी काम करित आहे असे सावंत म्हणाले.
पत्रकार परिषदेला खासदार ओम राजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, सभापती दत्ता अण्णा साळुंके, केशव सावंत,प्रशांत चेडे, संजय गाढवे उपस्तित होते